प्रेम संबंधाच्या संशयातून ग्रा.प.सदस्याची हत्या -9 संशयित अटकेत

On: March 8, 2022 7:13 AM

जळगाव : मारहाणीसह गळ्यावर धारदार शस्त्राने वार करत बोदवड नजीक मुक्तळ येथील शिवाजी गोकुळ पारधी या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. प्रेमसंबंधाच्या संशयातून ही हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी बोदवड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून 9 संशयीतांना अटक करण्यात आली आहे. हत्येनंतर मयत शिवाजी पारधी याचा मृतदेह मलकापूर रस्त्यावरील पुलाखाली फेकून देण्यात आला होता. मयत शिवाजी पारधी हा मुक्तळ ग्रामपंचायत सदस्य आहे.

यापुर्वी 6 मार्च रोजी शिवाजी बेपत्ता असल्याची मिसींग बोदवड पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आलीह होती. त्यानंतर त्याचा मृतदेहच आढळून आला. रविना उर्फ धनश्री सचिन कोल्हे (21), सचिन श्रीधर कोल्हे (32), श्रीधर रामधन कोल्हे (59), अमोल श्रीधर कोल्हे (30), नितीन भास्कर कोल्हे (32), निर्मलाबाई श्रीधर कोल्हे (50), सर्व रा.मुक्तळ ता.बोदवड तसेच पुंडलिक यशवंत वारके (49) व पल्लवी पुंडलिक वारके (36), रा. शिंदी ता.भुसावळ असे अटकेतील संशयीतांची नावे आहेत. सर्व संशयीतांना 11 मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment