बुलडाणा : बुलढाणा शहरातील जोडपे धाड येथे भाड्याची खोली पाहण्यासाठी गेले होते. सायंकाळी मोटारसायकलने परत येत असतांना वाटेत बुलडाणा – धाड रस्त्यावरील चिखला घाटात दोघा जणांनी त्यांची वाट अडवली. एकाने विवाहितेच्या पतीला मारहाण करुन दुस-याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर दुस-याने देखील तिच्यावर अत्याचार केला.
6 मार्च रोजी रात्री दहा वाजता घडलेल्या या घटनेप्रकरणी दोघा जणांविरुद्ध ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने बुलडाणा जिल्ह्यात खळबळ माजली आहे. विवाहितेच्या वैद्यकीय तपासणीअंती ग्रामीण पोलिसात सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघा पती पत्नीवर वैद्यकीय उपचार सुरु आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.







