बालकाचे मोटारसायकल चोरीचे प्रताप उघडकीस

On: March 8, 2022 7:40 PM

जळगाव : नाकाबंदीदरम्यान अल्पवयीन बालकास त्याच्या ताब्यातील मोटारसायकलसह अडवून चौकशी केली असता तो मोटार सायकल चोरटा असल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्या ताब्यातील मोटार सायकल चोरीची होती. तसेच यापुर्वी तिन मोटार सायकली चोरी केल्याचे देखील त्याने कबुल केले आहे. त्याने मोटार सायकल चोरी केलेले एकुण चार गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याच्या ताब्यातून चारही मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तो कुणी साधारण बालक नसल्याचे पोलिस पथकाच्या निदर्शनास आले.

एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो.नि. प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, हे.कॉ. मिलींद सोनवणे, पोलिस नाईक गणेश शिरसाळे, विकास सातदिवे, योगेश बारी असे सर्वजण काशिनाथ चौकात नाकाबंदी राबवत होते. दरम्यान एक मोटार सायकलस्वार अल्पवयीन बालक त्यांना संशयास्पद वाटला. त्याला अडवून त्याची चौकशी केली असता त्याच्या ताब्यातील मोटार सायकल चोरीची निघाली. त्याने एकुण चार मोटार सायकल चोरीचे गुन्हे केले आहे. त्याची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस नाईक गणेश शिरसाळे करत आहे.    

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment