उत्कृष्ठ तपास करणा-या एलसीबी पथकाचा डीआयजींच्या हस्ते सन्मान

On: March 11, 2022 8:51 PM

जळगाव : नाशिक परिक्षेत्र पोलिस उप महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांच्या हस्ते एलसीबीसह रामानंद नगर, एरंडोल, भुसावळ  बाजारपेठ, चाळीसगाव उप विभाग, चाळीसगाव शहर येथील  पोलिस  अधिकारी  व कर्मचारी  वर्गाचा सन्मान करण्यात आला आहे. उत्कृष्ठ तपास, उत्कृष्ठ अपराध सिद्धी व  चांगली कामगिरी केल्याबद्दल प्रसंशापत्र देऊन हा सन्मान करण्यात आला. वार्षिक तपासणीकामी डीआयजी डॉ. शेखर सध्या जळगाव येथे गेल्या  काही दिवसांपासून आले आहेत. आज झालेल्या गुन्हे आढावा बैठकीदरम्यान हा सन्मान करण्यात आला.

एरंडोल पोलिस स्टेशन येथे दाखल गु.र.नं. 23/2022 भा.द.वि. 395, 34 आर्म अ‍ॅक्ट 3/25  या गुन्ह्यात अवघ्या चोवीस तासांच्या आत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी निष्पन्न केले. तसेच या गुन्ह्यात गेलेली रोख रक्कम व सोने चांदीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले व त्यांच्या सहका-यांचा यथोचित सन्मान यावेळी करण्यात आला. पोलिस उप निरीक्षक अमोल देवढे, सहायक फौजदार अशोक महाजन, हे.कॉ. विजयसिंग पाटील, हे.कॉ. सुधाकर अंभोरे, हे.कॉ. जितेंद्र पाटील, अक्रम शेख, पोलिस नाईक नितीन बाविस्कर, नंदलाल पाटील, दर्शन ढाकणे व इतर कर्मचारी वर्गाचा सन्मान झाला.  इतर पोलिस स्टेशनच्या तुलनेत हे.कॉ. भरत दौलत लिंगायत हे पहुर पोलिस स्टेशनमधून एकमेव कर्मचारी सन्मानास पात्र ठरले आहेत हे विशेष उल्लेखनीय आहे. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment