भंगार व्यावसायीक शाहरुख खानच्या घरात लाखोची चोरी

On: March 19, 2022 3:54 PM

जळगाव : भंगार व्यावसायीक शाहरुख खान (मास्टर कॉलनी जळगाव) याच्या घरातून 2 लाख 26 हजार रुपयांच्या चोरीप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शाहरुख खान पत्नीसह बाहेर गेला असतांना त्याच्या उघड्या घरातील लाकडी कपाटातून 2 लाख 26 हजाराची रोकड 16 मार्च रोजी सकाळी चोरी झाली. हे.कॉ. योगेश सपकाळे यांनी गुन्हा दाखल केला असून घटनास्थळी स.पो.नि. अमोल मोरे यांनी भेट दिली. याप्रकरणी पो.नि.प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलिस उप निरीक्षक दिपक जगदाळे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment