उत्साहाच्या भरात नवरदेवाने केला गोळीबार– लग्नापुर्वीच उचलला पोलिस कारवाईचा भार!!

On: March 29, 2022 11:04 AM

अंबाजोगाई :  लग्नाच्या आधी हळदीच्या कार्यक्रमात जल्लोषात असलेल्या नवरदेवाने पिस्टल काढून हवेत गोळीबार केल्याने त्याच्यासह पाच जणांविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालाजी भास्कर चाटे (रा. साकुड ता. अंबाजोगाई) असे गुन्हा दाखल झालेल्या नवरदेवाचे नाव आहे.   

हळदीच्या कार्यक्रमात उत्साहाच्या भरात नवरदेव बालाजी याच्यासह त्याच्या मित्रांनी आपल्या ताब्यातील पिस्टल काढून हवेत फैरी झाडल्या. शनीवारी रात्री अंबाजोगाई शहरातील केज रस्त्यावरील मंगल कार्यालयात घडलेल्या या घटनेमुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. लग्नापुर्वीच नवरदेवाच्या हाती पोलिसांची बेडी पडण्याची वेळ या प्रसंगामुळे आली. या घटनेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला.  पोलिस नाईक गोविंद येलमाटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसर नवरदेव बालाजी चाटे याच्यासह त्याचे मित्र शेख बाबा (रा. क्रांतीनगर, अंबाजोगाई) व इतर तिघांवर अवैधरीत्या पिस्टल हाती घेत इतरांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे. पोलिस उप निरीक्षक गोपाळ सुर्यवंशी पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment