भुसावळ शहरातून तलवारी जप्त

On: March 30, 2022 3:34 PM

जळगाव : भुसावळ शहरातील मुस्लीम कॉलनी भागातून तिन तलवारी जप्त केल्या असून याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला गुलाम गौस कालू शहा याच्याविरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तलवार बाळगणा-या गुलाम यास अटक करण्यात आली आहे.

पो.नि. राहुल गायकवाड यांना समजलेल्या माहितीच्या आधारे सहायक फौजदार शरिफोद्दीन काझी, पो.कॉ. सचिन पोळ, अक्षय चव्हाण, योगेश माळी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास पोलिस नाईक महेश चौधरी करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment