गांधील माशी चावल्याने पोलिस मृत्युमुखी

On: April 4, 2022 5:25 PM

नाशिक : गांधील माशीने चावा घेतल्याने नाशिक पोलिस दलातील कर्मचा-याचा मृत्यु झाला आहे. यशवंत आनंदा भोये असे मयत झालेल्या हेड कॉन्स्टेबलचे नाव आहे. दिंडोरी पोइल्स स्टेशनला ते गार्ड ड्युटी बजावत होते.

गांधील माशी चावल्यानंतर हे.कॉ. यशवंत भोये (52) यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना लागलीच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचार घेण्याकामी त्यांना दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. याप्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment