जळगावात पुन्हा खूनाची घटना

On: April 4, 2022 9:59 PM

जळगाव : आज सायंकाळी जळगावच्या शिवाजीनगर हुडको परिसरात खूनाची घटना उघडकीस आली असून खळबळ माजली आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी याच परिसरात अनैतिक संबंधातून खूनाची घटना घडली होती. गेल्या काही दिवसात जळगाव शहरातील खूनाची तिसरी या परिसरातील दुसरी घटना घडली आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर अतिरिक्त पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता, पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, फॉरेन्सिक लॅबचे पथक दाखल झाले असून तपास सुरु आहे. काही वेळापुर्वी याबाबत शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद झालेला नव्हता. मोहम्मद मुसेफ शेख इसाक असे मयताचे नाव असल्याचे समजते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment