निर्वस्त्र करुन तरुणाची केली हत्या

On: April 6, 2022 12:33 PM

दारव्हा : जुन्या वादातून तरुणाला निर्वस्त्र करुन त्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दारव्हा तालुक्यातील लोही येथे 5 एप्रिलच्या सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेमुळे खळबळ माजली असून चौघे मारेकरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. रमेश विश्वनाथ राऊत (36) रा. हातोला ता. दारव्हा असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. गणेश वंजारी, विश्वास राऊत, वैभव दुरीक आणि नीलेश कटारे अशी पोलिसांच्या अटकेतील चौघा मारेक-यांची नावे आहेत.

लोही गावालगत असलेल्या पाणंद रस्त्याच्या कडेला निर्वस्त्र तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती मिळताच दारव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास व कारवाई सुरु केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत दारव्हा पोलिसांनी अवघ्या काही तासातच चौघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment