गावठी पिस्टलसह तरुणाला अटक

On: April 6, 2022 5:40 PM

जळगाव : गावठी पिस्टल बाळगणा-या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जामनेर – बोदवड रस्त्यावरील राजकमल हॉटेलसमोरुन पिस्टलसह ताब्यात घेतले आहे. अनुराग लक्ष्मण सनगत (20) रा.जामनेर ह.मु.वरणगाव असे त्याचे नाव आहे. त्याच्या कब्जातून विस हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्टल हस्तगत करण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध जामनेर पोलिस स्टेशनला शस्त्र अधिनियमनुसार कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

जामनेर येथे अनुराग सनगत हा कमरेला पिस्टल लावून दहशत माजवत असल्याची माहिती पो.नि. किरणकुमार बकाले यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिस उप निरीक्षक अमोल देवढे, सहायक फौजदार अशोक महाजन, हे.कॉ. लक्ष्मण पाटील, पोलिस नाईक विनोद पाटील, किशोर राठोड, रणजीत जाधव, श्रीकृष्ण देशमुख, पो.कॉ. इश्वर पाटील, चालक पो.कॉ. अशोक पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. अटकेतील अनुराग सनगत यास पुढील तपासकामी जामनेर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment