देवदर्शनासाठी गेलेल्या अभियंत्याकडे घरफोडी

On: April 18, 2022 12:13 PM

औरंगाबाद : उज्जैन येथे देवदर्शनासाठी गेलेल्या अभियंत्याचे बंद घर फोडून चोरट्यांनी 16 लाख 14 हजार 254 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने गायब केल्याचे उघड झाले आहे. 16 एप्रिल रोजी उघडकीस आलेल्या या घटनेप्रकरणी पुंडलीक नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

विशाखापट्टणम येथील मुळ रहिवासी असलेले कोप्पाक व्यंकट नरसिंग स्वामी (53), रा. सिडको एन-4 हे शेंद्रा एमआयडीसीतील कंपनीत अभियंता आहेत. सिडको परिसरातील बंडू चव्हाण यांच्या घरात ते भाड्याने राहतात. सुट्यांचा कालावधी जोडून आल्यामुळे ते परिवारासह उज्जैन येथे देवदर्शन करण्यासाठी गेले होते. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी आपली हात की सफाई दाखवली. घरफोडी करणारा सीसीटीव्हीत कैद झाला असून पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment