सुनेचा छळ व्हिडिओतून झाला उघड

On: April 19, 2022 12:31 PM

धुळे : सेवानिवृत्त प्राचार्याकडून सुनेवर सातत्याने होणारा अत्याचार व्हिडीओच्या माध्यमातून उघड झाला आहे. देवपूर पोलिस स्टेशनला सास-यासह पती व सासू अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेवानिवृत्त सास-याकडून होणारा अत्याचार जगापुढे येण्यासाठी सुनेने मोबाईलचा व्हिडीओ कॅमेरा सुरु ठेवून त्याचे चित्रीकरण करुन घेतले. तो व्हिडीओ सुनेने देवपूर पोलिसांना सोपवून आपल्यावरील अत्याचार उघड केला.

सेवानिवृत्त प्राचार्य विकास तायडे (सासरे), सेवानिवृत्त शिक्षिका शालिनी तायडे (सासू), आणि अश्विन तायडे (पती) अशा तिघांना अटक करण्यात आली आहे. अश्विन तायडे याच्यासोबत पिडीत फिर्यादी विवाहितेचे लग्न झाले आहे. लग्नानंतर तिचा पती अश्विन, सासू शालिनी तायडे, सासरा विकास तायडे यांनी वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला. पुणे येथे फ्लॅट घेण्यासाठी तिने माहेरुन चाळीस लाख आणावे असा तगादा लावण्यात आला. अखेर तिने या सर्व घटनेचा मोबाईल सुरु ठेवून चित्रीकरण करुन घेतल्यानंतर तिच्या आरोपाला ठोसपणा आला. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment