मुलीच्या छेडखानीवरुन हिंगोलीत तरुणाची निर्घृण हत्या

On: April 20, 2022 10:58 AM

हिंगोली : हिंगोली शहरातील तलाब कट्टा परिसरात मुलीच्या छेडखानीचा बदला घेण्यासाठी तरुणावर गुप्ती व खंजिराने हल्ला करत निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. शुभम राजे (23) असे या हल्ल्यात मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी बबलू धाबे, विश्वास मेकवाल, संतोष जोरेवार या तिघांविरुद्ध हिंगोली शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हिंगोली येथील तलाव पट्टा परिसरातील शुभम राजे व बबलू धाबे यांच्यात मुलीच्या छेडखानीच्या विषयावरुन काही दिवसांपुर्वी वाद झाला होता. 18 एप्रिल रोजी या वादाचा बदला घेण्यासाठी बबलू धाबे, विश्वास मेकवाल, संतोष जोरेवार या तिघांनी शुभमला बोलावून त्याच्यावर गुप्ती, खंजीर, लोखंडी पाइपने हल्ला चढवला. या हल्ल्यामुळे शुभम मोठ्या प्रमाणात जखमी झाला. घटनेनंतर तिघे हल्लेखोर पसार झाले होते. कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान तिघांना खुशालनगर परिसरातून ताब्यात घेत अटक करण्यात आली. मयत शुभमच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार हिंगोली शहर पोलिस स्टेशनला तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक विठूबोणे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment