मोबाईल चोरटे एलसीबीने केले अटक

On: April 23, 2022 8:59 PM

जळगाव : जबरीने मोबाईल हिसकावून गुन्हा करणा-या तिघांना एलसीबी पथकाने जेरबंद केले आहे. अटक करण्यात आलेल्या तिघांकडून एरंडोल पोलिस स्टेशनला दाखल मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. मोहंमंद अनिस उर्फ मुसा मोहंमंद युसुफ पिंजारी (28) रा. गेंदालाल मील जळगाव, मनोज विजय अहीरे (30) रा. गेंदालाल मील जळगाव व रहेमान रमजान पटेल (37) रा. लक्ष्मी नगर गेंदालाल मील जळगांव अशी अटक करण्यात आलेल्या तिघा गुन्हेगारांची नावे आहेत. तिघांना पुढील तपासकामी एरंडोल पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सुमारे एक महीन्यापुर्वी पारोळा – एरंडोल महामार्गावर रात्रीच्या वेळी एका इसमाकडून मुख्य आरोपी मोहमंद अनिस उर्फ मुसा व त्याचे साथीदार मनोज विजय अहीरे व रिक्षा चालक रहेमान रमजान पटेल अशा तिघांनी जबरीने मोबाईल हिसकावून घेतला होता. रेकॉर्डवरील गुन्हेगार मोहमंद अनिस उर्फ मुसा पिंजारी याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किरणकुमार बकाले यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांच्या सहका-यांनी मुख्य सुत्रधार व पोलिसांच्या अभिलेख्यावरील गुन्हेगार मोहंमद अनिस उर्फ मुसा पिंजारी यास त्याच्या दोघा साथीदारांसह गेंदालाल मिल रिक्षा स्टॉप परिसरातून ताब्यात घेण्यात आले. गुन्ह्यात वापरलेल्या रिक्षातच तिघे बसलेले होते. त्यांना अटक करण्यात आली.

अटकेतील तिघांकडून जबरी चोरी केलेला ओपो ए – 31 कंपनीचा मोबाईल तसेच गुन्ह्यात वापरलेली रिक्षा हस्तगत करण्यात आली आहे. या प्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशनला गु.र.न. 54/22 भा.द.वि. 392 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता. पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, अकरम शेख, पोना प्रीतम पाटील, नितीन बाविस्कर, पोकॉ सचीन चौधरी, चापोकॉ प्रमोद ठाकुर आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. आरोपीतांना पुढील कारवाई तसेच तपासकामी एरंडोल पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment