बंद घराचे कुलुप तोडून 58 हजारांचा ऐवज लंपास

On: April 28, 2022 3:50 PM

जळगाव : शहरातील मोहन नगर परिसरातील वृंदावन गार्डन नजीक कुलुपबंद घरातून रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने असा एकुण 58 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे.

उज्वल दत्तात्रय ठाकूर हा तरुण आपल्या आई व बहिणीसह मोहन नगर परिसरात राहतो. 19 एप्रिलच्या सायंकाळी घरातील सर्व सदस्य घराला कुलुप लावून परगावी नातेवाईकांकडे गेले. या संधीचा फायदा चोरट्यांनी घेतला. घराचे कुलुप तोडून आत प्रवेश करुन 58 हजार 500 रुपयांचा सोने चांदीच्या दागिन्यांचा समावेश असलेला मुद्देमाल गायब केला. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment