खासगी सावकारीप्रकरणी चौघे पोलिस कोठडीत

On: May 1, 2022 11:00 AM

धुळे : दहा ते पंधरा टक्के व्याजदराने कर्ज दिल्यानंतर तरुणाचे अपहरण करून त्याला मारहाण केल्याचा आरोप असलेल्या चौघांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मिनेश माहेश्वर बोडस (43) या तरुणाने याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली होती.

या तक्रारीच्या आधारे आबा वाणी उर्फ प्रमोद काशिनाथ वाणी, जितेंद्र बाबूराव वाघ, नीलेश हरळ, नितीन उर्फ बबन मधुकर थोरात अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौघांना न्यायालयात हजर केले असता 4 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment