प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या

On: May 21, 2022 9:57 AM

मालेगाव : विवाहाच्या आधीपासून सुरु असलेल्या प्रेमसंबंधात पतीचा अडथळा दूर करण्यासाठी पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून केल्याचे उघडकीस आले आहे. मालेगाव तालुक्यातील टाकळी येथे उघडकीस आलेल्या या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. मयत दीपक सुर्यवंशी याची संशयित पत्नी रोहिणी दीपक सूर्यवंशी (रा. टाकळी) व तिचा प्रियकर संशयीत आरोपी रवींद्र बुधा पवार (21), रा. तळवाडे यांना अटक करण्यात आली आहे.

टाकळी येथील दीपक हिरामण सूर्यवंशी (32) या तरुणासोबत रोहीणीचा विवाह झाला होता.घरात बेशुद्धावस्थेत आढळून आलेल्या दीपक यास 18 मे रोजी सामान्य रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले होते. पोलिसांचा या घटनेतील रोहीणीवर संशय बळावला. तिची सखोल चौकशी केल्यानंतर तिच्या बोलण्यात सुसुत्रता नव्हती. तिची सखोल चौकशी केल्यानंतर खूनाचा उलगडा झाला.  मयत दीपकचा भाचा सागर कडू निकम याने दिलेल्या फिर्यादीनुसार खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment