हत्येच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक

On: May 23, 2022 5:58 PM

जळगाव : जिल्हापेठ पोलिस स्टेशनला दाखल खूनासह आर्म अ‍ॅक्टच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस एलसीबी पथकाने अटक केली आहे. आकाश उर्फ अकी रविंद्र मराठे रा. तुकारामवाडी जळगाव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून सुमारे तिन महिन्यापासून तो फरार होता.

जळगाव जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गु.र.नं. 224/2022 भादंवि 302, 307, 143, 201 आर्म अ‍ॅक्ट 4/25 नुसार गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात आकाश मराठे हा फरार होता. तो पोलिसांना हवा होता.आकाश मराठे हा महाबळ परिसरातील गाडगे बाबा चौकात वावरत असल्याची माहिती एलसीबीचे पो.नि. किरणकुमार बकाले यांना समजली. या माहितीच्या आधारे पोहेकॉ विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, पोना विजय शामराव पाटील, पोना प्रितम पिंताबर पाटील यांचे पथक आकाश मराठे यास ताब्यात घेण्याकामी रवाना करण्यात आले. त्याला शिताफीने ताब्यात घेत अटक करण्यात आली. त्याला पुढील तपासकामी जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment