विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणा-या क्लास संचालकास अटक

On: May 23, 2022 8:09 PM

अकोला : अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याचा आरोप असलेल्या चौधरी कोचींग क्लासचा संचालक वसीम चौधरी याच्याविरुद्ध सिव्हील लाइन्स पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसीम चौधरी यास अटक करण्यात आली आहे.

एका अल्पवयीन विद्यार्थीनीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार तिच्यासोबत मोबाइलवर चॅटिंग करणे, रुमवर बोलावून अश्लील चाळे केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी वसीम चौधरी विरुद्ध भादंवि 354 (अ,ब,ड) विनयभंग करणे, पोस्कोच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सिव्हिल लाइन्स पोलिस करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment