खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक

On: May 25, 2022 10:00 PM

जळगाव : गेल्या दोन महिन्यापासून खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस जिल्हापेठ पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. पवन उर्फ बड्ड्या दिलीप बाविस्कर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हापेठ पोलिस स्टेशनला दाखल गु.र.न. 224/2022 भा.द.वि.302 नुसार त्याच्याविरुद्ध खूनाचा आरोप आहे. शहरातील कालिका माता मंदीर परिसरातून त्याला अटक करण्यात आली आहे.

जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे पोहेकाँ सलीम तडवी व पोकाँ रविन्द्र साबळे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पो.नि. अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ महेन्द्र पाटील, पोना गणेश पाटील, पोकाँ विकास पहुरकर, पोहेकाँ सलीम तडवी व पोकाँ रविन्द्र साबऴे आदींच्या पथकाने आरोपी पवन उर्फ बड्ड्या बाविस्कर यास शिताफीने ताब्यात घेत अटक केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment