विद्यार्थिनीसोबत चाळे करणा-या चौधरीविरुद्ध कलमात वाढ

On: May 27, 2022 10:16 AM

अकोला : विद्यार्थिनीसोबत अश्लिल चाळे केल्याच्या आरोपाखाली अकोला येथील चौधरी कोचिंग क्लासचा संचालक वसीम चौधरी सध्या पोलिस कोठडीत आहे. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत 30 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे.

तपासाअंती वसीम चौधरी याच्याविरुद्ध भा.द.वि. 375 (3) या गुन्ह्याची वाढ करण्यात आली आहे. खासगी क्लास चालक वसीम चौधरी याने विद्यार्थिनीसोबत मोबाइलवर अश्लील चॅटींग केल्याचा आरोप असून त्याने तिला खोलीवर बोलावून तिच्यासोबत अश्लील चाळे केल्याचे देखील तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी विद्यार्थीनीच्या तक्रारीनुसार वसीम चौधरीविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment