दंगलीतील वॉंन्टेड आरोपी पोलिसांच्या ताब्यात

On: May 27, 2022 8:58 PM

जळगाव : जळगाव शहरातील संवेदनशील परिसर समजल्या जाणा-या तांबापुर भागातील दंगलीतील पोलिसांना हवा असलेल्या आरोपीस अटक करण्यात आली आहे. रिजवान उर्फ काल्या गयासुद्दीन शेख रा. अजमेरी गल्ली तांबापुरा जळगाव असे त्याचे नाव आहे.

गुन्हा घडल्यापासून रिजवान हा फरार होता. पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार रिजवान याच्यावर एकुण विस गुन्हे दाखल आहेत. त्याला हद्दपार देखील करण्यात आले होते. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना समजलेल्या माहितीच्या आधारे त्याला शिताफीने अटक करण्यात आली आहे. सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सय्यद, सुधीर साळवे, मुकेश पाटील, सचिन पाटील, किशोर पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. उद्या 28 मे रोजी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment