मोटार सायकली, ट्रॅक्टर ट्रॉली चोरणा-यास अटक

On: May 31, 2022 10:28 PM

जळगाव : मोटार सायकली व ट्रॅक्टर ट्रॉली चोरणा-या अट्टल चोरट्यास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. गोरख चंद्रसिंग ठाकरे रा. नाचणखेडा ता. पाचोरा असे अटकेतील चोरट्याचे नाव असून त्याच्या ताब्यातून चोरीच्या तिन मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.

गोरख ठाकरे याच्याविरुद्ध पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव पोलिस स्टेशनला चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तो भडगाव पोलिस स्टेशनला दाखल ट्रॅक्टर चोरीच्या गुन्ह्यात फरार होता. त्याला पुढील तपासकामी पाचोरा पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना समजलेल्या माहितीच्या आधारे त्याला पथकाने ताब्यात घेत अटक केली. या गुन्ह्याच्या तपासकामी पोहेकॉ विजयसिंग पाटील, पोहेकॉ सुधाकर अंभोरे, पो.ना. राहुल पाटील पो.ना. प्रितम पाटील, पो.ना. विजय पाटील, चालक पो.ना. भरत पाटील आदींनी सहभाग घेतला. अटकेतील आरोपीकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment