जळगाव : लहान मुलांच्या खेळण्याचा वादातून विवाहितेचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला विवाहितेच्या फिर्यादीनुसार चौघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव नवेगाव येथे विवाहीता आणि परिसरात राहणा-या एकाची मुले खेळत होती. दरम्यान त्या लहान मुलांचा आपसात वाद सुरु झाला. सदर वाद वाढत गेल्याने विवाहीता तिच्या मुलाची बाजु मांडण्यासाठी गेली. दरम्यान दुस-या मुलाच्या बाजूने त्याचे वडील आणी त्यांच्यासोबत तिघे असे चौघे जण आले. आलेल्या दोघा पुरुष व दोघा महिलांनी विवाहितेवर हल्ला करुन तिच्या वस्त्रांची ओढाताण करुन ते वस्त्र फाडून तिच्या मनाला लज्जा निर्णाण होईल असे कृत्य केले. दरम्यान विवाहीतेचा पती हा वाद सोडवण्यासाठी आला असता त्याला देखील चौघांनी चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. विवाहितेची सासू आली असता तिला देखील मारहाण करत ढकलून दिल्याचा विवाहितेचा आरोप आहे. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला चौघांविरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हे.कॉ. दिपक ठाकुर करत आहेत.







