अवैध दारु विक्रेत्यांविरुद्ध कारवाई

On: June 2, 2022 5:53 PM

जळगाव : एमआयडीसी परिसरातील अवैध दारु विक्रेत्यांविरुद्ध आज कारवाई करण्यात आली. दारुबंदी कायद्याखाली चार गुन्हे दाखल करण्यात आले असून चौघांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

अशोक तुकाराम कोळी रा. रामेश्वर कॉलनी जळगाव, करण दारासिंग बागडे रा. सुप्रिम कॉलनी जळगाव, दत्तु पुना पाटील रा. म्हाडा कॉलनी जळगाव, अमोल तुकाराम पाटील रा. खेडी ता.जि. जळगाव अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चौघांची नावे आहेत. त्यांच्याकडून एकुण 2460 रुपयांची देशी दारु व 1500 रुपयांची गावठी हातभट्टी दारु जप्त करण्यात आली. पो.नि. प्रताप शिकारे यांच्या पथकातील सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, हे.कॉ. रामकृष्ण पाटील, पोलिस नाईक गणेश शिरसाळे, पोलिस नाईक इमरान अली सैय्यद, हेमंत कळसकर, योगेश बारी, मुदस्सर काझी, महिला पोलिस नाईक निलोफर सैय्यद, पो.कॉ.चंद्रकांत पाटील, मुकेश पाटील, साईनाथ मुंडे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment