नाशिक जिल्हा रुग्णालयातील परिचारिकेची आत्महत्या

On: June 3, 2022 4:23 PM

नाशिक : नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील परिचारिकेने तिच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याप्रकरणी पंचवटी  पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. शीतल अरविंद सरोदे (38), रा. गोकुळ सोसायटी, तारवालानगर, दिंडोरीरोड असे आत्महत्या केलेल्या परिचारिकेचे नाव आहे.

राहत्या घरी पंख्याला दोरीच्या साह्याने गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली. हा प्रकार त्यांच्या भावाच्या लक्षात आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांना मयत घोषित करण्यात आले. मयत शीतल सरोदे या अतिदक्षता विभागात कार्यरत होत्या. गेल्या वर्षी त्यांची मालेगाव येथे बदली झाली होती मात्र त्याठिकाणी त्या हजर झाल्या नव्हत्या. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment