शिरपूर-सुरत बसमध्ये सापडला 80 हजाराचा गांजा

On: June 4, 2022 10:41 AM

नवापूर : नंदुरबार-नवापूर दरम्यान शिरपूर-सुरत बसमध्ये सुका गांजा असलेली बेवारस बॅग सीटखाली आढळून आली. या बेवारस बॅगची पोलिसांनी तपासणी केली असता त्यात सुमारे 80 हजार रुपये किमतीचा आठ किलो गांजा आढळून आला.

नवापूर पोलिस स्टेशनचे स.पो.नि.नीलेश वाघ व त्यांच्या सहका-यांनी घटनास्थळी धाव घेत कायदेशीर कारवाई केली. पोलिस स्टेशनला अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment