सुरा बाळगणा-या तरुणास अटक

On: June 8, 2022 10:01 PM

जळगाव : कमरेला सुरा लावून वावरणा-या तरुणास एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. राकेश कैलास सपकाळे (19) रा. मोठा हनुमान मंदीराजवळ, रामेश्वर कॉलनी जळगाव असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. रामेश्वर कॉलनी परिसरातून त्याला अटक करण्यात आली आहे.

पो.कॉ. गोविंदा पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राकेश सपकाळे याच्याविरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.नि. प्रताप शिकारे यांच्या पथकातील स.फौ. आनंदसिंग पाटील, पो.ना. गणेश शिरसाळे, पो.ना. विकास सातदिये, पो.ना. सचिन पाटील, पो.ना. योगेश बारी, पो.कॉ. गोविंदा पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment