पत्नीचा फोन सारखा बिझी येत असल्यामुळे केली हत्या

On: June 9, 2022 10:24 AM

औरंगाबाद : चारित्र्याबद्दल संशय असणा-या पत्नीचा फोन सारखा सारखा बिझी येत असल्यामुळे आपण तिची हत्या केल्याचे अटकेतील आरोपीने पोलिसांना सांगितले आहे. स्वयंपाक घरातील दगडी खलबत्त्याने ठेचून पत्नी बिल्कीस ऊर्फ मीना मच्छिंद्र पिट्टेकर (50) हिची हत्या केल्याच्या आरोपाखाली मच्छिंद्र पिराजी पिट्टेकर (55) जा सध्या अटकेत आहे.

पत्नीची हत्या केल्यानंतर हल्लेखोर संशयीत आरोपी फरार झाला होता. मच्छिंद्र नगर चिलकनवाडीतून त्याला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. रात्री घरी जावून झोपणे आणि दिवस उजाडण्यापुर्वी फरार होणे असा त्याचा दिनक्रम झाला होता. सातारा पोलिसांनी तो झोपेत असतांनाच त्याला ताब्यात घेण्यात आले. पत्नीचे फोन सारखे सारखे बिझी येत असल्यामुळे आपण तिची हत्या केल्याचे त्याने कबुल केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment