खावटीच्या रकमेसह सोन्याची चेन हिसकावली पतीने

On: June 9, 2022 2:22 PM

जळगाव : गळ्यातील सोन्याच्या चेनसह न्यायालयाच्या माध्यमातून खावटीपोटी पत्नीला मिळालेली पाच हजाराची रक्कम पतीने हिसकावून घेतल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय महिलेला तिच्या पतीसह सासूने अश्लिल शिवीगाळ केली. तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य पतीने केले. त्या सर्व घडामोडीविरुद्ध महिलेने जिल्हापेठ पोलिस स्टेशनला पती व सासु विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील बी.जे. मार्केट मधील कौटूंबिक न्यायालयात सदर महिलेने पतीविरुद्ध दावा दाखल केला आहे. न्यायालयाच्या पायरीवर पत्नीला बघताच तिच्या पतीसह सासूने तिच्याकडील रक्कम, सोन्याची चेन आदी चीजवस्तू हिसकावून घेतल्या. दरम्यान तिचे वडील तिच्या बचावासाठी आले असता त्यांना देखील चापटा बुक्यांनी मारहाण केल्याचा आरोप महिलेने केला आहे. याशिवाय पतीच्या मित्राने देखील तिचा हात धरुन तिच्यासोबत लज्जास्पद गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. पुढील तपास जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे स.पो.नि. किशोर पवार करत आहेत. आरोपीस अद्याप अटक नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment