गावठी कट्टा बाळगणा-या तरुणास अटक

On: June 9, 2022 5:16 PM

जळगाव : जळगाव शहरातील खंडेराव नगर परिसरातून गावठी कट्टा बाळगणा-या तरुणास अटक करण्यात आली आहे. अश्विन हिरे असे अटक करण्यात आलेल्या कट्टा बाळगणा-या तरुणाचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून सुमारे तिस हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला आहे. पुढील तपासकामी त्याला रामानंद नगर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पो.नि.किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ. सुधाकर अंभोरे, महेश महाजन, पोना विजय पाटील, पोना प्रितम पाटील, पोकॉ. सचिन महाजन, पोकॉ पंकज शिंदे आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment