मोबाईल चोरट्याकडून तलवार जप्त

On: June 9, 2022 5:35 PM

जळगाव : मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखेचे शोध पथक भुसावळ येथे गेले असता त्यांच्या हाती तलवारीसह मोबाईल चोरटा गवसला. त्याला अटक करण्यात आली आहे. शे. सादिक शे. नसीर (38) रा. भिस्तीवाडा, जाम मोहल्ला भुसावळ असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला पुढील तपासकामी जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

अटकेतील आरोपी शे. सादीक शे. नसीर हा जिल्हापेठ पोलिस स्टेशनला दाखल मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील संशयीत आरोपी आहे. पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील स. फौ अनिल जाधव, पो.हवा. अनिल देशमुख, कमलाकर बागुल व चालक हे.कॉ. विजय चौधरी आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment