गावठी कट्टा बाळगणा-यास अटक

On: June 12, 2022 10:09 PM

जळगाव : गावठी कट्टा बाळगणा-या तरुणास जळगाव शहरातील शनीपेठ भागातील आंबेडकर नगर परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करण्यात आली आहे. सागर सुरेश सपकाळे असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या कब्जातून विनापास विना परमीट बेकायदा गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किरणकुमार बकाले यांच्या पथकातील हे.कॉ. विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, पोलिस नाईक विजय पाटील, प्रितम पाटील, पो.कॉ.सचिन महाजन, पंकज शिंदे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. अटकेतील सागर सपकाळे यास पुढील कारवाईकामी शनीपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. त्याच्या विरुद्ध भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment