नारायण राणे यांचे गंभीर आरोप; पुराव्यासाठी पोलिसांचे आवाहन

On: August 5, 2020 6:31 PM

मुंबईबॉलीवुड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या कथित आत्महत्येनंतर दररोज काहीना काही खुलासे व चर्चांना उत आला आहे. काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी गंभीर आरोप केला आहे. सुशांतची असिस्टंट मॅनेजर दिशा सालियन हिचा  बलात्कार करून तिचा मर्डर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या मालवणी पोलीस स्टेशनमार्फत दिशा सालियन आत्महत्येबाबत कुणाला काही माहिती असल्यास ती देण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. दिशा सालियन हिच्या मृत्युसंदर्भात मालवणी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासकामी  माहिती देण्याच्य आवाहनास प्रतिसाद मिळाल्यास संबंधित बाबींची शहानिशा करणे शक्य होणार आहे. दिशा सालियन हिचा खून झाला होता की तिने आत्महत्या केली होती याबाबत विविध चर्चांना पेव फुटले आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची आत्महत्या नसून तो खून असल्याचा देखील आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला आहे. दिशा सालियनच्या शव विच्छेदन अहवालात तिच्या गुप्त भागावर जखमा झाल्याचे नमुद असतांना त्या दृष्टीने तपास होण्याची गरज असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे. त्यासाठी इतर पुराव्यांची गरज नसल्याचे देखील नितेश राणे यांनी म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment