प्रशिक्षणार्थी नर्सची नाशिकला गळफास घेत आत्महत्या

On: June 16, 2022 11:54 AM

नाशिक : परिचारिका महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी परिचारिकेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. माधुरी काशीनाथ टोपले (19) असे आत्महत्या करणा-या परिचारिकेचे नाव आहे.

सुरगाणा येथील माधुरी परिचारिका महाविद्यालयात प्रथम वर्षासाठी एएनएमला शिक्षण घेत होती. हॉस्टेलमधील एका प्रशिक्षणार्थी मैत्रीणीचा वाढदिवस साजरा होत असतांना तिला सतत कुणाचेतरी फोन येत होते. रात्री रुमवर गेल्यानंतर तिने गळ्यातील ओढणीच्या मदतीने पंख्याला लटकावून आत्महत्या केली. सकाळी हा प्रकार इतर मुलींच्या लक्षात आला. डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment