मै जहा भी हू….खुश हू…. पतीला व्हाईस मेसेज टाकणारी विवाहिता रफू चक्कर

On: June 22, 2022 10:32 AM

जळगाव : पाचोरा शहरातील मानसिंगका कॉलनीतील सत्तावीस वर्षाची विवाहिता बेपत्ता झाली आहे. घरातून कुणाला काही न सांगता बेपत्ता झालेल्या या विवाहितेने मै जहा भी हू…… खुश हू……. आप मेरी चिंता मत करो….आप मुझे ढुंढने की कोशीश मत करो असा व्हाईस मेसेज पतीच्या मोबाईलवरील व्हाटसअ‍ॅप वर पाठवल्याने पतीची चिंता मात्र वाढली आहे.

पाचोरा शहरातील मानसिंगका कॉलनीतील सुस्वरुप घरातील 27 वर्ष वयाची विवाहिता 21 जून रोजी दुपारी दिड वाजेच्या सुमारास घरातून कुणाला काही न सांगता निघून गेली आहे. या प्रकरणी तिच्या सास-यांनी पाचोरा पोलिस स्टेशनला मिसींग दाखल केली आहे. घरातून निघून जातांना या विवाहितेने निळ्या रंगाचा कुर्ता व केशरी रंगाची सलवार परिधान केली होती. तिच्या उजव्या हातावर टॅटू गोंदलेला आहे. दरम्यान या घटनेने पाचोरा शहरात खळबळ माजली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment