पो.नि.व्यंकटेश केंद्रेंवरील शस्त्रक्रिया यशस्वी

On: June 24, 2022 8:44 AM

औरंगाबाद : पोलिस निरीक्षक व्यकटेश केंद्रे यांच्या यकृताला गंभीर जखम झाली होती. त्या जखमेतून होणारा रक्तस्त्राव थांबल्यामुळे करण्यात आलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. पो.नि.केंद्रे यांची गंभीर प्रकृती आता आटोक्यात आली असून स्थिर झाली आहे. तिन तासानंतर डॉक्टरांच्या पथकाला शस्त्रक्रियेत यश आले.

शेख मुजाहेद शेख उस्मान या पोलिस कर्मचा-याने केलेल्या चाकूहल्ल्या पो.नि. केंद्रे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर सुरुवातीला अ‍ॅपेक्स रुग्णालयात व नंतर एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. 21 जून रोजी घरुन निघतांनाच शेख मुजाहेद याने सोबत चाकू आणला होता. 25 जून पर्यंत मुजाहेद पोलिस कोठडीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment