वृद्ध महिलेच्या हत्येप्रकरणी संशयीतास अटक

On: June 24, 2022 6:31 PM

जळगाव : जामनेर तालुक्यातील पहुर येथील वयोवृद्ध महिलेच्या हत्येप्रकरणी संशयीतास अटक करण्यात पहुर पोलिसांना यश आले आहे. पहुर पोलिस स्टेशनचे पो.नि. प्रताप शिकारे यांच्या पथकातील कर्मचा-यांनी बब्बू सांडू तडवी यास अटक केली आहे.

मानबाबाई सरदार तडवी (85) या वृद्ध महिलेची ती घरात एकटी झोपली असतांना हत्या करण्यात आली होती. 21 जून रोजी जामनेर तालुक्यातील गोद्री या गावी रात्री घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ माजली होती. या घटनेत हत्या झालेल्या मानबाबाई हिच्या कानातील सोन्याच्या बाळ्या, हातातील दोन चांदीचे पाटले असा एकुण 32 हजार 600 रुपयांचा ऐवज ओरबाडून नेण्यात आला होता. याप्रकरणी शेनफडाबाई बेलदार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पहुर पोलिस स्टेशनला विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास लागला असून बब्बू सांडू तडवी यास अटक करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment