गिरणा नदी पात्रात वाहून गेलेला तरुण अद्याप बेपत्ता

On: June 25, 2022 8:41 AM

जळगाव : गिरणा नदी पात्रात शुक्रवारच्या दुपारी पोहण्यासाठी गेलेला तरुण अद्याप सापडला नसून बेपत्ता आहे. रोहन कसोटे असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव असून त्याचे वडील मनपा कर्मचारी आहेत.

नदीपात्रात रोहन वाहून गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्या मित्रांनी एकच हल्लकल्लोळ केला. त्यांनी सदर घटनेची माहिती परिचितांना दिली. दरम्यान नगरसेवक ललित कोल्हे यांनी दिलेल्या माहितीनुसार मनपा अग्नीशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन अधिकारी शशिकांत बारी यांच्यासह वाहन चालक देविदास सुरवाडे, फायरमन वसंत कोळी, रोहिदास चौधरी, सरदार पाटील आदींनी बराच वेळ शोधकार्य सुरु ठेवले. मात्र पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्यामुळे वाहून गेलेल्या रोहनचा शोध लागलेला नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment