पोलिसांच्या तावडीतून पळाला बंदी

On: June 25, 2022 1:04 PM

जळगाव : पोलिसांच्या कायदेशीर कब्जात असलेल्या बंदीने त्यांच्या हाताला हिसका देत पलायन करण्यास यश मिळवले आहे. राजेश एकनाथ निकुंभ रा. सुभाष चौक अमळनेर असे पलायन केलेल्या बंदी आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

24 जूनच्या सायंकाळी अमळनेर न्यायालयातील कामकाज आटोपून राजेश निकुंभ या बंदीस जळगावला बसने आणले जात होते. अमळनेर बस स्थानक परिसरात मुख्यालयातील पोलिस कर्मचा-यांच्या ताब्यातील राजेश निकुंभ याने शिताफीने हिसका देत तेथून पलायन केले. या घटनेप्रकरणी सहायक फौजदार रमेश सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार विलास पाटील करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment