संपादकाच्या वाहनास धडक देणा-या बुलेटस्वाराविरुद्ध गुन्हा

On: June 26, 2022 5:33 PM

जळगाव : महाराष्ट्राचा मानबिंदू म्हटल्या जाणा-या जळगाव आवृत्तीच्या कार्यकारी संपादकांच्या वाहनाला बुलेटस्वाराने धडक दिल्याची घटना 25 जूनच्या रात्री घडली. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला बुलेट स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिकाचे कामकाज आटोपून रात्री 11.10 वाजता कार्यकारी संपादक आपल्या चारचाकी वाहनाने महामार्गालगत भुसावळच्या दिशेने घराकडे जात होते. त्यावेळी उजव्या बाजुने साईड इंडीकेटर देत वळण घेतांना डबलसिट बुलेटस्वाराने त्यांच्या कारला धडक दिली. त्यात कारसह बुलेटचे देखील नुकसान झाले. बुलेटस्वार मद्यपान करुन वाहन चालवत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. घटनेच्या वेळी जमलेल्या लोकांनी बुलेटस्वारास उपचारार्थ दवाखान्यात नेले. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून हे.कॉ. प्रदीप पाटील पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment