पती – पत्नी हॉलमधे, चोरी झाली बेडरुममधे

On: June 26, 2022 6:20 PM

जळगाव : पती – पत्नी रात्री घराच्या हॉलमधे झोपले असतांना बेडरुम मधे चोरी झाल्याची घटना सकाळी उघडकीस आली. रोकड, सोने चांदीचे दागीने व मोबाईल असा 61 हजार रुपयांचा ऐवज या घटनेत चोरी झाल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरीष चंद्रकांत चौधरी हे आपल्या परिवारासह खेडी शिवारातील प्रेम बेकरीनजीक राहतात. त्यांची मुलगी आजी आजोबांकडे यावल तालुक्यातील महेलखेडी येथे गेली आहे. 25 जूनच्या रात्री पती पत्नी घराच्या हॉलमधे झोपले होते. घराचा मागील दरवाजा आतून नक्की बंद केला होता अथवा नाही याबाबत अस्पष्टता आहे. सकाळी बेडरुममधील सामान अस्ताव्यस्त असल्याचे दोघांना आढळून आले. पाहणीअंती 25 हजार रुपये रोख, 15 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, 3 हजार रुपये किमतीचे चांदीचे पैंजन, 18 हजार रुपये किमतीचे मोबाईल असा एकुण 61 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेल्याचे आढळून आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पो.नि. प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment