जबरी चोरी, लुटमार करणा-या हद्दपार आरोपीस अटक

On: June 26, 2022 10:30 PM

जळगाव : जबरी चोरी व लुटमारीचे सहा गुन्हे दाखल असणा-या हद्दपार आरोपीस जळगाव शहरातील कंजरवाडा परिसरातून अटक करण्यात आली आहे. आकाश उर्फ मट्या अनिल बागडे, रा. संजय गांधी नगर असे अनाधिकारे शहरात वावरतांना अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना समजलेल्या माहितीच्या आधारे त्यांच्या पथकातील सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलिस नाईक हेमंत कळसकर, सचिन पाटील, सुधीर साळवे, ईम्रान सैय्यद, पोकॉ साईनाथ मुंढे, राकेश बच्छाव आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. आरोपी आकाश बागडे यास सिंगापूर कंजरवाडा परिसरातून अटक करण्यात आली. पो.कॉ. चंद्रकांत बळीराम पाटील यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment