दरमहा 5 हजाराच्या खंडणीसाठी वडापाव विक्रेत्याला मारहाण

On: June 27, 2022 10:51 AM

जळगाव : व्याजाचे पैसे परत केले नाही म्हणून मारहाण करत दरमहा पाच हजार रुपये द्यावे लागतील, नाहीतर वडापावची गाडी लावू देणार नाही अशी धमकी देणा-याविरुद्ध महाराष्ट्र सावकार अधिनियमानुसार भुसावळ शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहीत नगर भुसावळ येथील वडा पाव विक्रेता संतोष रामा चौधरी यांनी याप्रकरणी गणेश कवडे उर्फ गणेश बिल्डर (गवळी वाडा भुसावळ) याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. 25 जून रोजी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास संतोष चौधरी यांच्या घरी येवून त्यांना गणेश बिल्डर याने पाच हजाराची मागणी व शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांसह फायटरने मारहाण केली. स.पो.नि. संदीप दुनगहू पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment