बडनेरा रेल्वे स्टेशनवर तोतया टीसीला अटक

On: June 27, 2022 12:04 PM

अमरावती : बडनेरा रेल्वे स्टेशनवर रविवारी पहाटे एका तोतया तिकीट तपासणीसाला अटक करण्यात आली. रेल्वे पोलिसांनी त्याच्याकडून 12 हजार 130 रुपयांचा मुद्देमाल व बनावट पावती पुस्तक जप्त केले आहे. या पावती पुस्तकातील 29 पावत्या फाटल्या असून ती रक्कम अर्थातच त्याने वसुल केली आहे. राज भय्यालाल मालविय (32) असे पोलिसांच्या ताब्यातील तोतया टीसीचे नाव आहे. तो पाचबंगला, जुनी वस्ती, राठीनगर, बडनेरा येथील रहिवासी आहे.

रविवारी पहाटे 4 वाजून 10 मिनिटांनी नवजीवन एक्स्प्रेस बडनेरा रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर त्याला पकडण्यात आले. रेल्वे पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक वैशाली शिंदे व उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत तारगे यांच्या मार्गदर्शनात प्रभारी अधिकारी अजितसिंग राजपूत, पोलिस उपनिरीक्षक राजेश वरठे, सपोनि हर्षल चाफले व प्रदीप गाडवे, नायक पोलिस प्रसन्नजीत कुर्वे, शिपाई सागर पेठे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. तोतया टिसी भय्यालाल मालविया याच्याविरुद्ध भा.द.वि. 170,171,419,465 व 471 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment