चाकूचा धाक दाखवत वडापाव विक्रेत्याची चाळीसगावला लुट

On: June 27, 2022 4:24 PM

जळगाव : चाकूचा धाक दाखवत बुलेटचालक वडापाव विक्रेत्याला चाळीसगाव नजीक वाघळी ते हिंगोणे दरम्यान तिघांनी मारहाण केली. विशाल संजय लिंगायत असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. 25 जून रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या जामनेर तालुक्यातील हिवरखेडा येथे राहणा-या विशाल लिंगायत या तरुणाचा नाशिकला वडापाव विक्रीचा व्यवसाय आहे. वाघळी ते हिंगोणे दरम्यान बुलेटने जात असतांना अज्ञात तिघा जणांनी त्याला अडवले. त्याच्या बुलेटची चावी काढून घेत त्याला शेतात ओढत नेले. तिघांनी त्याच्याकडील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र विशालने ती बॅग आपल्याकडे घट्ट पकडून ठेवली. तिघांपैकी एकाने विशालकडे असलेला मोबाईल व 27 हजार रुपये रोख असा ऐवज बळजबरी काढून घेतला. या घटनेप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप अटकेत नसून पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.रमेश चव्हाण पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment