सराफी दुकानातून रोख रकमेसह दागिने चोरी

On: June 27, 2022 5:17 PM

जळगाव : नाचनखेडा ता. जामनेर येथील तेजस ज्वेलर्स या दुकानातील सोने, चांदी व रोख रक्कम असा 70 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीप्रकरणी पहुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुकानमालक निलेश रमेश पाटील रा. पहुर यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.

20 हजार रुपये किमतीचे सोने, 20 हजार रुपये किमतीची चांदी व 30 हजार रुपये रोख असा ऐवज चोरी 25 ते 26 जून दरम्यान चोरी झाला आहे. अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे चॅनल गेट व शटरच्या कुलुपाच्या पट्ट्या कटरने कापून आत प्रवेश करत चोरी केल्याचे आढळून आले आहे. पो.नि. प्रताप इंगळे यांच्य्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक संजय बनसोड पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment