नशीराबाद नजीक तिहेरी वाहनांच्या धडकेत चौघे जागीच ठार

On: June 29, 2022 10:24 AM

जळगाव : जळगाव – भुसावळ दरम्यान महामार्गावर सिमेंट फॅक्ट्री – उड्डान पुलानजीक दोघा वाहनांवर पलीकडून येणारा ट्रक आदळल्याने चौघांचा जागीच तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यु झाल्याचे वृत्त आहे. आज सकाळी झालेल्या या भयावह अपघाताने परिसरात खळबळ माजली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की जळगावहून भुसावळच्या दिशेने बुधवारी पहाटे एमएच 43 एडी 1051 आणि एमएच 43 बीबी 0050 या क्रमांकाची दोन पिकअप वाहने भुसावळच्या दिशेने जात होती. दरम्यान सिमेंट फॅक्टरीनजीक ही दोन्ही वाहने आली असता रेल्वे उड्डाणपुलावरील वळण रस्त्यावर पलीकडून जळगावच्या दिशेने जाणारी ट्रक (एमपी 09 एजी 9521) दोघा पिक अप वाहनांवर आदळली. या जोरदार धडकेत चौघांचा जागीच तर एकाचा दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मालवाहू वाहनातील काही प्रवासी उड्डानपुलावरुन खाली पडून जखमी झाले तर अपघातग्रस्त ट्रक उड्डाणपुलाच्या सुरक्षा भिंतीवर चढला. नजीकच्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पीटलमधे जखमींना नेण्यात आले. त्यातील एकाचा मृत्यू झाला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment