गरम तेल अंगावर फेकत गल्ल्यातील रकमेसह दोघांचे पलायन

On: June 30, 2022 2:32 PM

जळगाव : हॉटेलमधे आल्यानंतर थेट गल्ला ताब्यात घेणा-या दोघांना जाब विचारणा-या हॉटेल मालकाच्या अंगावर लोखंडी कढईतील गरम तेल फेकून रकमेसह पलायन करणा-या दोघांविरुद्ध रावेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रावेर शहरातील रुस्तम चौकात शेख तन्वीर शेख शकील अहमद या तरुणाची ए -वन चिकन सेंटर नावाची हॉटेल आहे. या हॉटेलमधे 29 जून रोजी सलीम बेग अजीज बेग आणि शेख तौसिफ शेख हे दोघे आले. आल्यावर दोघांनी थेट हॉटेलमधील पैशांचा गल्ला अनाधिकारे उचलत चालू लागले. याबाबत शेख तन्वीर याने दोघांना विचारणा केली असता त्यांना राग आला. चिकन तळण्याचा गॅसवर ठेवलेल्या लोखंडी कढईतील गरम तेलाने भरलेला झारा उचलून त्यांनी हॉटेल मालक शेख तन्वीर याच्या अंगावर फेकला. त्यात शेख तन्वीर याचे दोन्ही हात, छाती व पोट भाजले. दरम्यान गल्ल्यातील अंदाजे पंधराशे रुपये घेत दोघांनी पलायन केले. या घटनेप्रकरणी रावेर पोलिस स्टेशनला दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.पो.नि. शितलकुमार नाईक करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment